Mobile Number : +91 8380803322  |  Email ID : vyapteetourism@gmail.com  |  Address : H-1002,Pristine Prolife, Phase 1, Wakad, Maharashtra. (India) - 411 057


केरळ कन्याकुमारी मदुराई रामेश्वरम - ०९ रात्री - १० दिवस

10 Days 9 Nights (Rs. 34000/-)

Tour Overview

Itinerary

Day
1

5 Dec 2022- कोचीन - मुन्नार ( 126 kms - 4hrs)

कोचीन एअरपोर्ट येथे आपले आगमन. कोचीन एअरपोर्ट वर  पिक उप होईल आणि कोचिन कडे रवाना होऊ. रस्त्यात आपण चेयप्पारा आणि वलारा वॉटरफॉल आणि मसाल्यांच्या बागेला भेट देणार . मुन्नार येथे आगमन आणि हॉटेल चेक इन . मुक्काम मुन्नार

 

स्थळदर्शन - वलारा,चेयप्पारा वॉटरफॉल , मसाल्यांचे मळे 

Day
2

6 Dec 2022 - मुन्नार

सकाळी ब्रेकफास्ट करून आपण एलिफन्ट सफारी , राजामलाई नॅशनल पार्क तसेच आण्णामुडी या केरळ मधील सर्वात उंच शिखरास भेट देऊयात.

यानंतर कन्ननदेवी टी इस्टेट मध्ये टी मुझियमला भेट देऊयात. दुपार नंतर मट्टूपेट्टी डॅम, इको पॉईट तसेच चहाचे

मळे पाहुयात फोटो शेशनचा आनंद घेऊयात. मुन्नार मुक्काम.

 

स्थळदर्शन - एलिफन्ट सफारी ,राजामलाई नॅशनल पार्क,आण्णामुडी शिखर , टी मुझियम, मट्टूपेट्टी डॅम, इको पॉईट

Day
3

7 Dec 2022- मुन्नार टेक्काडी (91kms - 3 hrs)

आज आपण टेक्काडी साठी प्रस्थान करूयात. नंतर आपण येथील मसाल्याच्या बागेस भेट देऊयात. सांयकाळी

टेक्काडी येथे कथकली नृत्याचा आनंद घेऊयात. आपण या ठिकाणी केरळचे प्रसिद्ध मसाले देखील खरेदी करू

शकता. टेक्काडी मुक्काम.

 

स्थळदर्शन - मसाले बाग , कथकली नृत्य

Day
4

8 Dec 2022 - टेक्काडी- मदुराई (138 kms- 3h 22min)

आज आपण मदुराई साठी प्रस्थान करूयात. तत्पूर्वी आपण पेरियार नॅशनल पार्क अभयारण्यास बोटिंग द्वारे भेट

देऊयात. (पेरियार नॅशनल पार्क मध्ये बोटिंग करणे हे तेथील बोटिंगची तिकीट मिळण्यावर अवलंबून असते.)

मदुराई येथे आगमन. नंतर आपण मदुराई येथील प्रसिद्ध मीनाक्षी मंदिरात दर्शन घेऊयात. मदुराई मुक्काम.

 

स्थळदर्शन -पेरियार नॅशनल पार्क अभयारण्य बोटिंग , मदुराई मीनाक्षी मंदिर

Day
5

9 Dec 2022 - मदुराई- रामेश्वरम स्थळदर्शन ( 171 kms - 4 hrs)

आज आपण रामेश्वर साठी प्रस्थान करणार आहोत. रामेश्वर पोहचल्यानंतर आपण धनुषकोडी, माजी

राष्ट्रपती डॉक्टर श्री ए पी जे अब्दुल कलाम मेमोरियल तसेच त्यांच्या पुर्वाश्रमीचीचे निवासाला भेट देणार

आहोत. सायंकाळी श्री रामानाथ स्वामीचे दर्शन घेणार आहोत. रामेश्वर मुक्काम.

 

स्थळदर्शन -धनुषकोडी , राष्ट्रपती डॉक्टर श्री ए पी जे अब्दुल कलाम मेमोरियल आणि निवास, श्री रामेश्वरम ज्योतिर्लिंग 

 

Day
6

10 Dec 2022 - रामेश्वरम कन्याकुमारी (309 kms - 5hrs 30min)

आज आपण पहाटे 5:30 वाजता श्री रामानाथ मंदिरात स्फटिकलिंगाचे दर्शन घेणार आहोत. त्यानंतर समुद्र

स्नान करणार आहोत. मंदिरातील 22 कुंडातील पवित्र पाण्याने स्नानाचा आनंद घेऊयात. त्यानंतर आपण

कन्याकुमारी साठी प्रस्थान करणार आहोत. कन्याकुमारी मुक्काम.

 

स्थळदर्शन रामेश्वरम- रामानाथ मंदिरात स्फटिकलिंगाचे दर्शन

Day
7

11 Dec 2022 - कन्याकुमारी त्रिवेंद्रम स्थळदर्शन (88kms - 2hrs 30min)

आज आपण त्रिवेंद्रम करीता प्रस्थान करणार आहोत. तत्पूर्वी आपण स्वामी विवेकानंद स्मारकास भेट देणार

आहोत. माता कन्याकुमारीचे दर्शन करून, त्रिसमुद्र दर्शन, गांधी मंडपमला भेट देणार आहोत. सायंकाळी

त्रिवेंद्रम आगमन. त्रिवेंद्रम मुक्काम.

 

स्थळदर्शन कन्याकुमारी - पद्मनाभपूरम पॅलेस ,स्वामी विवेकानंद स्मारक,माता कन्याकुमारीचे दर्शन ,त्रिसमुद्र दर्शन,गांधी मंडपम ,सुचित्रम मंदिर  

Day
8

12 Dec 2022 - त्रिवेंद्रम स्थळदर्शन

आज आपण त्रिवेंद्रमच्या प्रसिद्ध पद्मनाभम स्वामी मंदिरास भेट देणार आहोत. त्यानंतर चित्रा आर्ट गॅलरी व

नेप्पियार म्युझियमला भेट देणार आहोत. (सोमवारी बंद) सायंकाळी आपण आपण कोवलमच्या रमणीय अशा

समुद्रतीरी समुद्र स्नानाचा आनंद घेणार आहोत. त्रिवेंद्रम मुक्काम.

 

स्थळदर्शन - पद्मनाभम स्वामी मंदिर,चित्रा आर्ट गॅलरी,नेप्पियार म्युझियम,कोवलम बीच

Day
9

13 Dec 2022 - त्रिवेंद्रम- अल्लेपी (146kms-3hrs)

आज आपण अल्लेपी साठी प्रस्थान करूयात. अल्लेप्पी येथे भारतातील सर्वात मोठया अशा "वेम्बनाड”

सरोवर येथे आपण हॉउसबोट मध्ये निवास करण्याचा आनंद घेऊयात. मुक्काम अल्लेपी.

 

स्थळदर्शन - जटायू मंदिर 

Day
10

14 Dec 2022 - अल्लेपी कोचीन पुणे प्रस्थान

ब्रेकफास्ट केल्यानंतर आपण हॉउसबोटमधून चेक आऊट करूयात आणि एअरपोर्ट / रेल्वे स्टेशन साठी प्रस्थान करूयात.

आपण होम टाऊन साठी प्रस्थान करणार आहोत.

कोचिन स्थळदर्शन

छोट्टानीकरा मंदिर 

एडपल्ली नागराज मंदिर 

चायनिज फिशिंग नेट 

फोर्ट कोचिन बीच 

 

Hotel Details

City Name

Price Details

Validity Start Validity End
18-11-2022 18-11-2022

Inclusion

Exclusion

More Details

Journey Beyond Expectations


Book Now